Shruti Vilas Kadam
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) सोशल मीडियावर नेहमीच आपल्या चाहत्यांशी संवाद साधतो. अलीकडेच एका चाहत्याने त्याला मजेशीर प्रश्न विचारला “सर, मी मुंबईत आलोय तुमच्या वाढदिवसानिमित्त, पण राहायला जागा नाहीये. ‘मन्नत’मध्ये एक रूम भाड्याने मिळेल का?”
या प्रश्नावर शाहरुखने दिलेलं उत्तर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं. त्याने मजेत उत्तर दिलं, “मन्नतमध्ये तर माझ्याकडेच सध्या रूम नाहीये… मीच भाड्याने राहतोय आता!”
या एका उत्तराने चाहत्यांना हसू फुटलं. शाहरुखच्या विनोदी स्वभावाचं आणि चाहत्यांशी असलेल्या जवळिकीचं हे उत्तम उदाहरण ठरलं.
शाहरुख सध्या आपल्या ‘मन्नत’ या बंगल्या मध्ये काही रिनोव्हेशन (नूतनीकरण) चालू असल्यामुळे काही काळासाठी भाड्याच्या जागी राहत असल्याचंही समोर आलं आहे.
चाहत्याचा प्रश्न आणि शाहरुखचं उत्तर ट्विटर (X) वर काही मिनिटांत हजारोंनी शेअर केलं गेलं. “किंग खान”ची मजेशीर शैली चाहत्यांना खूप आवडली.
या संवादाचा दिवसही खास होता. २ नोव्हेंबर, शाहरुख खानचा वाढदिवस! त्या दिवशीच त्यांनी चाहत्यांना धन्यवाद देत हा मजेदार संवाद साधला.
‘मन्नत’मध्ये राहायला रूम मागणारा चाहता आणि त्यावर आलेलं शाहरुखचं विनोदी उत्तर यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं की शाहरुख फक्त सुपरस्टार नाही, तर आपल्या चाहत्यांना मनापासून जोडणारा व्यक्तिमत्त्वही आहे.