Manasvi Choudhary
दूध शरीरासाठी अत्यंत पौष्टिक मानले जाते. अनेकांना रात्री दूध पिण्याची सवय असते. मात्र पावसाळ्यात रात्री दूध प्यावे की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो.
पावसाळ्यात हवेत दमटपणा जास्त असल्यामुळे पचनक्रिया मंदावते यामुळे तुम्हाला जर अपचन, गॅस, सर्दी किंवा कफचा त्रास असेल, तर रात्री दूध पिणे शक्यतो टाळावे कारण दूध पचायला त्रास होऊ शकतो.
पावसाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास होतो यामुळे जर दुधामध्ये चिमूटभर हळद आणि सुंठ पावडर प्यायले, तर इम्युनिटी वाढण्यास मदत होते.
दुधामधील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हाडे आणि स्नायू मजबूत ठेवण्यास मदत करतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.