Manasvi Choudhary
गरोदरपणाचा काळ हा प्रत्येक महिलेसाठी अत्यंत महत्वपूर्ण असतो. या दरम्यान महिलांनी त्यांच्या शरीराची काळजी घेणे महत्वाचे आहे. स्वत:च्या आरोग्यासह बाळाच्या वाठीकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे.
योगा केल्याने मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. गरोदरपणाच्या काळात स्त्रियांनी योगा करणे महत्वाचे आहे.
गरोदरपणात स्त्रियांनी तणाव कमी करणाऱ्या, लवचिकता वाढवणाऱ्या आणि ताकद वाढवणाऱ्या योगासनाचा सराव करणे महत्वाचे आहे.
१) गरोदरपणात स्त्रिच्या शरीरात अनेक बदल होतात यावेळी शांत, स्थिर वाटावे यासाठी तुम्ही योगासनांवर लक्ष केंद्रित करा.
२) गरोदरपणात व्यायाम केल्याने स्नायू मजबूत होतात आणि लवचिकता वाढल्याने प्रसूती सुलभ होण्यास मदत होते.
३) गर्भधारणेत गर्भाशयाचे वजन वाढल्याने येणारा पाठीवरील आणि कमरेवरील ताण योगामुळे कमी होतो. पाठ आणि कंबरदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते.
४) गरोदरपणात प्राणायाम आणि ध्यान केल्याने गरोदरपणातील चिंता, भीती आणि स्ट्रेस दूर होऊन मन शांत राहते.
गरोदरपणात मागे वाकणे, पुढे वाकणे आणि पोटावर जास्त दाब टाकणारी व्यायामे करणे टाळा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.