Manasvi Choudhary
भात तेल किंवा तूप न टाकता बनवा. यामुळे भातामधील कॅलरीचे प्रमाण कमी होते. यामुळे वजन वाढणार नाही.
भात आवडत्या भाज्यांसोबत बनवा. भाज्यांमध्ये जास्त फायबर्स असतात. यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते. वजन सहज कमी होते.
पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन तांदूळ खा. यामध्ये पांढऱ्या तांदळापेक्षा जास्त फायबर्स आणि कमी कॅलरी असतात.
तांदळासोबत इतर डाळी मिक्स करून खिचडी बनवा. यामध्ये कॅलरी कमी प्रमाणात असतात. शरीराला भरपूर प्रथिने मिळतात.
तांदूळ डाळ किंवा राजमासोबत खा. या पदार्थांमध्ये प्रथिने अधिक प्रमाणात असते. यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन कमी होते.
भात तयार करताना यामध्ये जिरे किंवा मीरपूड टाकल्याने शरीरात चरबीचे प्रमाण कमी होते. यामुळे वजन कमी होईल.