Manasvi Choudhary
आजकाल मधुमेह ही गंभीर समस्या बनली आहे. मधुमेहाच्या रूग्णांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
मधुमेहांनी खाण्यापिण्याच्या सवयी पाळल्या नाहीतर रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते.
डायबिटीजच्या रूग्णांनी मधुमेह झाल्यावर दूध प्यावे की नाही? याबाबत अनेक प्रश्न आहेत.
आरोग्य तज्ज्ञानुसार, दुधामध्ये लॅक्टोज असते ज्यामुळे रक्तातील साखर हळूहळू वाढू शकते.यासाठी तुम्ही दूध पिणे पूर्णपणे बंद न करता दूध कमी प्रमाणात प्यावे.
दुधामध्ये प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी १२ ही पोषकतत्वे असतात जी शरीरासाठी फायदेशीर असतात.
मधुमेहाचे रूग्ण रोज एक ग्लास दूध पिऊ शकता. यामध्ये कोणतेही फ्लेवर्डचे दूध पिऊ नका. मिल्क शेक पिणे टाळावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावरव आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.