Manasvi Choudhary
डायबिटीज हा आजार सध्या वेगाने वाढत आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींचा परिणाम आरोग्यावर होतो आहे.
डायबिटीजच्या रूग्णांना त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. रक्तातील साखर वाढू नये म्हणून कोणताही पदार्थांचे सेवन करताना लक्ष देणे महत्वाचे आहे.
डायबिटीजचे रूग्ण स्ट्रॉबेरी खाऊ शकतात की नाही? असा अनेकांचा संभ्रम आहे. बटाटा खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते का? हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
डायबिटीजचे रूग्ण स्ट्रॉबेरीचे सेवन करू शकतात. स्ट्रॉबेरीचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो यामुळे या फळाचे सेवन केल्याने रक्तातील साखर वाढत नाही.
स्ट्रॉबेरीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते यामुळे पचनक्रिया देखील सुधार, भूक नियंत्रणात राहते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.