Manasvi Choudhary
सकाळच्या नाश्त्यामध्ये इडली आणि डोसा हे अत्यंत लोकप्रिय आणि आवडीने खाल्ले जाणारे पदार्थ आहेत. चवीला हलके आणि पचायला सोपे असल्यामुळे अनेकजण ते आवडीने खातात.
परंतू, डायबिटीजचे रूग्ण नाश्त्यामध्ये इडली- डोसा खाऊ शकतात का? रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी काय खावे? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
डायबिटीजचे रुग्ण इडली आणि डोसा खाऊ शकतात, परंतु ते कसे बनवले आहेत आणि त्याचे प्रमाण किती आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.
डायबिटीजच्या रुग्णांनी भरपूर तेल किंवा बटर लावलेला 'मसाला डोसा' किंवा चीज डोसा खाणे पूर्णपणे टाळावे. त्याऐवजी तुम्ही साधा डोसा, सांबर आणि नारळाची चटणी मर्यादित प्रमाणात खाऊ शकता.
कोणतीही गोष्ट अति प्रमाणात खाल्ल्यास ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. त्यामुळे नाश्त्यात २ इडल्या किंवा १ मध्यम आकाराचा साधा डोसा तुम्ही खाऊ शकतात.
तांदळाचे प्रमाण कमी करून डाळी, ओट्स किंवा भरड धान्यापासून बनवलेली इडली-डोसा तुम्ही खाऊ शकता.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.