Manasvi Choudhary
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीनुसार खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे ॲसिडिटी, अपचन आणि मधुमेह यांसारख्या गंभीर आरोग्याचा परिणाम उद्भवू शकतो.
यावर घरगुती उपाय म्हणून बरेचजण ‘ब्लू टी’ पितात. ब्ल्यू टी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे.
अपराजिताच्या निळ्या फुलांपासून तयार होणाऱ्या या चहामध्ये अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत. ॲसिडिटी आणि मधुमेहासाठी ब्ल्यू टी फायदेशीर आहे त्याचे प्रभावी गुणधर्म जाणून घ्या.
ब्ल्यू टीमधील अँटीऑक्सिडंट्स पचनक्रिया मजबूत करतात आणि गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
ब्ल्यू टी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. या चहाचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते यामुळे मधुमेह रूग्ण या चहाचे सेवन करू शकता.
वजन कमी करण्यासाठी ब्ल्यू टी पिणे फायदेशीर आहे. ब्ल्यू टी प्यायल्याने शरीरातील चरबी घटण्यास आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.