Sugar Free Tea: साखर न टाकता चहा लागेल गोड! ‘ही’ एक सोपी ट्रिक आजच करून पाहा

Manasvi Choudhary

चहा

भारतात चहा अत्यंत प्रसिद्ध आहे. अनेकांच्या दिवसाची सुरूवात ही चहाने होते. चहा प्यायल्याशिवाय नवीन दिवसाला सुरूवात झाली असे वाटत नाही.

Sugar Free Tea Recipe

चहाची सवय

अनेकाना दिवसांतून दोन ते तीन कप चहा पिण्याची सवय असते. मात्र गोड चहा आरोग्यासाठी घातक ठरू शकतो यासाठी चहामध्ये साखरेचे प्रमाण कमी ठेवावे. मात्र आज आम्ही तुम्हाला साखरेशिवाय चहा गोड कसा करायचा ही ट्रिक सांगणार आहोत.

Sugar Free Tea Recipe

स्टीव्हिया वनस्पतीचा वापर करा

जर तुम्हाला साखर न टाकता चहा गोड करायचा असेल तर तुम्ही त्यात स्टीव्हिया वनस्पती वापरा. स्टीव्हिया ही वनस्पती गोडवा देते. मधुमेही स्टीव्हिया चहा पिऊ शकता.

Stevia

गुळाचा चहा

साखेरेऐवजी चहा बनवण्यासाठी गुळाचा वापर करू शकता. गुळामुळे चहामध्ये फक्त गोड चव येत नाही तर लोह, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात.

Jaggery Tea | Canva

नारळाची साखर

नारळ नैसर्गिकरित्या गोड असतात. गोड चहा बनवण्यासाठी तुम्ही साखरेऐवजी नारळाची साखर वापरू शरता. नारळाच्या साखरेने चहा गोड चव येते.

coconut | yandex

मध

गोड चहा बनवण्यासाठी तुम्ही साखरेऐवजी मध वापरू शकता. कोणत्याही पदार्थाला गोड चव येण्यासाठी मध बेस्ट आहे.

honey | yandex

खजूर पावजर

साखर न टाकता चहा गोड हवा असेल तर त्यात खजूर पावडर मिक्स करा. खजूरमध्ये नैसर्गिक गोडवा असतो.

Date Sugar | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते? जाणून घ्या

Pumpkin Seeds Benefits
येथे क्लिक करा...