Indian Railways: कॉल आणि एसएमएसने कॅन्सल होऊ शकतं ट्रेनचं तिकीट?

Surabhi Jayashree Jagdish

काउंटर तिकीट रद्द करण्याची प्रक्रिया

भारतीय रेल्वेने काउंटरवरून खरेदी केलेलं तिकीट रद्द करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केलीये. यामुळे प्रवाशांना तिकीट रद्द करण्यासाठी तातडीने स्टेशनवर जाण्याची गरज काही प्रमाणात कमी झाली आहे. ही सुविधा विशेषतः अचानक प्रवास रद्द झालेल्या प्रवाशांसाठी उपयुक्त ठरते.

Railway Ticket Cancellation | saam tv

कॉल किंवा एसएमएसद्वारे करता येते विनंती

प्रवासी कॉल किंवा एसएमएसच्या माध्यमातून तिकीट रद्द करण्याची विनंती नोंदवू शकतात. ही प्रक्रिया केवळ रद्द करण्याची विनंती नोंदवण्यासाठी असते, त्यावेळी तिकीट पूर्णपणे रद्द झाल्याचं समजायचं नसतं.

Counter Ticket Cancellation | saam tv

पीएनआर आणि तिकीटाची माहिती आवश्यक

तिकीट रद्द करण्यासाठी पीएनआर क्रमांक आणि तिकीटाशी संबंधित आवश्यक माहिती द्यावी लागते. योग्य माहिती दिल्यानंतरच रद्द करण्याची विनंती स्वीकारली जाऊ शकते. त्यामुळे कॉल किंवा एसएमएस करताना सर्व तपशील अचूक असणं महत्त्वाचं आहे.

Train Ticket Refund | saam tv

रिफंडसाठी स्टेशनवर जाणं आवश्यक

कॉल किंवा एसएमएसद्वारे विनंती नोंदवल्यानंतर ठराविक कालमर्यादेत मूळ तिकीट आणि ओळखपत्र घेऊन स्टेशनवरील आरक्षण काउंटरवर जावे लागते. तेथे आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच परताव्याची रक्कम मिळते. म्हणजेच कॉल किंवा एसएमएसमुळे स्टेशनला जाण्याची गरज पूर्णपणे संपत नाही.

Railway Refund Rules | saam tv

कॅन्सलेशन फी लागू होऊ शकते

रेल्वेच्या विद्यमान नियमांनुसार तिकीट रद्द केल्यावर निश्चित रद्द शुल्क वजा केलं जाऊ शकतं. परताव्याची रक्कम तिकीटाचा प्रकार आणि रद्द करण्याची वेळ यावर अवलंबून असतं. त्यामुळे तिकीट रद्द करण्यापूर्वी लागू असलेल्या नियमांची माहिती घेणं फायदेशीर ठरतं.

Railway Counter Ticket | saam tv

वेळेत तिकीट जमा करणं गरजेचं

परतावा मिळवण्यासाठी रेल्वेने निश्चित केलेल्या कालमर्यादेत आरक्षण काउंटरवर मूळ तिकीट जमा करणं आवश्यक असतं. ही अट पूर्ण न केल्यास रिफंड मिळण्यात अडचण येऊ शकते. या सुविधेमुळे वारंवार स्टेशनवर जाण्याची आणि लांब रांगेत उभे राहण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होते.

PNR Number | saam tv

Heart attack symptoms: 1 महिना अगोदर ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

Heart attack symptoms | saam tv
येथे क्लिक करा