ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कॅल्शियम हे आपल्या हाडे आणि दातांसाठी आवश्यक असलेले खनिज आहे. दूध हे कॅल्शियमचा एक प्रमुख स्रोत आहे, पण अजून इतर कोणते पदार्थ आहेत ते जाणून घ्या.
ओमेगा-३ आणि फायबरने समृद्ध असलेले चिया सीड्स कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो.
बदाम आणि काजूमध्ये सर्वाधिक कॅल्शियम आहे. तसेच हे हृदयासाठी देखील फायदेशीर आहे.
हिवाळ्यात तिळाचे सेवन जास्त प्रमाणात केले जाते. तीळ हे शरीरासाठी गरम मानले जातात. कॅल्शियमचा उत्तम स्रोत असल्याने हाडांच्या आरोग्यासाठी तीळ फायदेशीर आहेत.
पालक हि अशी पालेभाजी आहे ज्यामध्ये भरभरुन कॅल्शियम आहे. कॅल्शियमसोबत लोहाचे देखील प्रमाण आहे.
ब्रोकोलीमध्ये के आणि सी व्हिटॅमिन्स असल्यामुळे यात कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते.
दही हे दुधापासून बनवले जाते. दह्यात प्रोबायोटिक्ससह कॅल्शियम आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.