Cold Coffee Recipe : ना मिक्सर, ना ब्लेंडर; 'या' स्मार्ट ट्रिकने घरीच बनवा कॅफेसारखी कोल्ड कॉफी, उन्हाळ्यात मिळेल गारवा

Shreya Maskar

उन्हाळा

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे कॅफेत जाऊन २००-३०० रुपयांची कोल्ड कॉफी पिण्यापेक्षा घरीच सिंपल पद्धतीने मिक्सर आणि ब्लेंडरचा वापर न करता कोल्ड कॉफी बनवा. रेसिपी नोट करा.

Summer Season | pinterest

कोल्ड कॉफी साहित्य

कोल्ड कॉफी बनवण्यासाठी फुल क्रीम दूध, कॉफी पावडर, साखर, गरम पाणी, व्हॅनिला आईस्क्रीम किंवा फ्रेश क्रीम, चॉकलेट सिरप आणि बर्फाचे तुकडे इत्यादी साहित्य लागते.

Cold Coffee Ingredients | pinterest

कॉफी पावडर

कोल्ड कॉफी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या बॉटलमध्ये कॉफी पावडर आणि साखर एकत्र करा. त्यात २ मोठे चमचे गरम पाणी घालून चांगले ढवळा. यामुळे कॉफीचा स्वाद अधिक खुलून येतो.

Coffee Powder | pinterest

दूध

आता यात थंड दूध मिक्स करा. त्यानंतर मिश्रण दाट आणि फेसदार होईपर्यंत जोरात फेटा किंवा हलवा. तुम्ही यात हात आणि चमच्याचा वापर करा. २-३ मिनिटांत कोल्ड कॉफी चांगली मिक्स होईल. यामुळे दाट आणि घट्ट फेस तयार होईल.

Milk | pinterest

ग्लास सजवा

सर्व्हिंग ग्लासच्या काठावर चॉकलेट सिरप ओता. त्यानंतर तयार कोल्ड कॉफी मिक्स करा. यात बर्फाचे तुकडे टाका. अशाप्रकारे कॅफे स्टाइल कॉफी तयार होईल.

Decorate the Glass | pinterest

व्हॅनिला आईस्क्रीम

कोल्ड कॉफीची चव आणखी वाढवण्यासाठी व्हॅनिला आईस्क्रीमचा एक स्कूप त्यात टाका आणि वरून कॉफी पावडर शिंपडा.

Vanilla Ice Cream | pinterest

शरीराला थंडावा देते

थंड कॉफी मिनिटांत ताजेतवाने करून शरीराला ऊर्जा देते. गरम कॉफीच्या तुलनेत कमी आम्लतेमुळे ती पोटासाठी फायदेशीर ठरते.

Provides Cooling Relief | pinterest

चयापचय सुधारते

कोल्ड कॉफी काळी किंवा कमी-कॅलरीयुक्त पदार्थांसोबत प्यायल्यास ती शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवते. चयापचय क्रिया सुधारते.

Improves Metabolism | pinterest

NEXT : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

Mirchi Pakora | pinterest
येथे क्लिक करा...