Manasvi Choudhary
दररोज बऱ्याच महिला ऑफिस, कॉलेज आणि इतर कामांसाठी कॅबने प्रवास करतात.
कॅबमुळे प्रवास सोयीस्कर झाला असला, तरी एकट्याने किंवा रात्रीच्या वेळी प्रवास करताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
जेव्हा तुम्ही कॅब बुक करता तेव्हा विश्वासनीय अॅपचा वापर करणे महत्वाचे आहे.
कॅबमध्ये बसल्यानंतर तुमचा लोकेशन तुमच्या जवळच्या मित्र-मैत्रिणीला किंवा आई- वडिलांना पाठवून ठेवा.
तुम्ही जर रात्री प्रवास करत असाल तर ड्रायव्हर तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊ जात आहे की नाही हे तपासा.
कॅबमध्ये नेहमी मागच्या सीटवर बसायला प्राधान्य द्या. हातामध्ये मोबाईल फोन ठेवा.
जर प्रवासादरम्यान ड्रायव्हरचे वागणे संशयास्पद वाटले, मार्ग बदलला गेला किंवा तुम्हाला थोडेही अस्वस्थ वाटू लागले, तर गर्दीतही टॅक्सी थांबवायला सांगा आणि खाली उतरा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.