Dhanshri Shintre
सनातन धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे; पूजा आणि खरेदी शुभ मानली जाते. जाणून घ्या सोने खरेदीचा मुहूर्त.
पंचांगानुसार ३० एप्रिल २०२५ रोजी अक्षय तृतीया साजरी होईल. पूजा केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात.
पंचांगानुसार अक्षय्य तृतीया २९ एप्रिल सायंकाळी ५:३१ वाजता सुरू होऊन ३० एप्रिल दुपारी २:१२ वाजता संपेल.
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीचा शुभ मुहूर्त पहाटे ५:४१ वाजता सुरू होतो आणि खरेदीने शुभ परिणाम मिळतात.
अक्षय्य तृतीयेला देवी लक्ष्मीची पूजा केल्याने संपत्ती, समृद्धी आणि प्रगतीच्या संधी साधकाच्या जीवनात वाढतात.
अक्षय्य तृतीयेला पूजनावेळी 'ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीध प्रसीधं ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मायै नमः' मंत्र जपा.
अक्षय्य तृतीयेला गरीबांना सोने, चांदी, अन्न, कपडे दान केल्यास आयुष्यात कधीही कमतरतेचा अनुभव येत नाही.