Dhanshri Shintre
अक्षय्य तृतीयेला शुभ कार्यासाठी उत्तम मुहूर्त मानला जातो. या दिवशी योग्य रीतीने पूजा केल्यास सुख-समृद्धी प्राप्त होते.
गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करा.
भगवान विष्णू व देवी लक्ष्मीची प्रतिमा किंवा मूर्ती पूजेसाठी ठेवा.
तांब्या/मातीच्या भांड्यात पाणी, सुपारी, नाणं टाका आणि वर नारळ ठेवा.
तुपाचा दिवा आणि अगरबत्ती प्रज्वलित करा.
देवतांना हळद-कुंकू, फुले, अक्षता आणि नैवेद्य अर्पण करा.
विष्णू आणि लक्ष्मीच्या स्तोत्रांचा जप करा आणि आरती म्हणा.
खीर, गोड पदार्थ, फळे किंवा घरचा नैवेद्य अर्पण करा.
अन्न, वस्त्र, धान्य किंवा सोनं याचं दान करावं. ही दिवशी केलेलं दान "अक्षय" मानलं जातं.