Sovereign Gold Bond Scheme | स्वस्तात खरेदी करा सोनं अन् मिळवा जबरदस्त रिटर्न

Shraddha Thik

स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी

तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. आजपासून सरकार स्वस्तात सोने विकणार आहे. हे सोने तुम्हाला सवलतीच्या दरात मिळेल.

Sovereign Gold Bond Scheme | Yandex

ही किंमत आहे

सॉवरेन गोल्ड बाँड स्कीम 2023-24 सीरिज-4 ही फेब्रुवारी 12-16 या तारखे दरम्यान 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुली असेल. यासाठी इश्यू किंमत 6,263 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यास व्याजही मिळेल आणि जीएसटीचीही बचत होईल.

Sovereign Gold Bond Scheme | Yandex

सवलत मिळेल

सॉवरेन गोल्ड बाँड या स्कीमचा परतावा उत्कृष्ट आहे. यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात यामध्ये गुंतवणूक करू इच्छितात. ऑनलाइन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल माध्यमातून पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना अंकित मूल्यावर 50 रुपये प्रति ग्रॅम सट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Sovereign Gold Bond Scheme | Yandex

सरकारी हमी

सरकारच्या वतीने आरबीआयद्वारे सॉवरेन गोल्ड बाँड जाहिर केले जातात. त्यामुळे त्याला सरकारी हमी असते. यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीवर खात्रीशीर परतावा मिळतो. यामध्ये गुंतवणुकीवर वार्षिक 2.5 टक्के व्याज मिळतो. हे पैसे दर 6 महिन्यांनी गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

Sovereign Gold Bond Scheme | Yandex

4 किलोपर्यंत सोने खरेदी करू शकता

वैयक्तिक गुंतवणूकदार किमान एक ग्रॅम गुंतवणुकीपासून सुरुवात करू शकतात. त्याच वेळी, एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 4 किलो सोने खरेदी करू शकते.

Sovereign Gold Bond Scheme | Yandex

ही कागदपत्रे लागतील

यासाठी तुम्हाला व्होटर आयडी, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट यांसारख्या केवायसी कागदपत्रांची आवश्यकता असेल. यामध्ये परमनंट अकाउंट नंबर म्हणजेच आयकर विभागाने जारी केलेले पॅन कार्ड अनिवार्य आहे.

Document | Yandex

कुठे खरेदी करायची?

सॉवरेन गोल्ड बाँड शेड्यूल्ड कमर्शियल बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, क्लिअरिंग कॉपर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नियुक्त पोस्ट ऑफिस, NSE आणि BSE द्वारे विकले जातील.

Share Market | Yandex

Next : Rituals | तुमचं नशीब उजळेल, तृतीयपंथींना 'या' वस्तू करा दान

Rituals | Saam Tv
येथे क्लिक करा...