Manasvi Choudhary
उपवास करताना शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवणे आणि पचनक्रिया सुरळीत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते.
उपवासाच्या काळात साबुदाणा, बटाटा किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे अनेकदा ॲसिडिटी, अपचन आणि पोटाची जळजळ होण्याचा त्रास होतो. अशा वेळी पोटाला थंडावा देण्यासाठी ताक आणि दही याचे सेवन केले जाते.
परंतु, उपवासाच्या वेळी ताक आणि दही यांपैकी कोणता पर्याय आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरतो? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
दह्यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम असते. उपवासाच्या दिवशी दही खाल्ल्याने भूक लवकर लागत नाही आणि शरीराला ताकद मिळते.
दह्यामध्ये असलेले चांगले घटक आतड्यांचे आरोग्य उत्तम ठेवतात आणि यामुळे पचनक्रिया देखील सुधारते.
दह्याच्या तुलनेत ताक पचायला हलके असते. यामुळे पोटावर ताण पडत नाही. जडपणा वाटत नाही.
ताकात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीर हायड्रेट राहते आणि पोटातील उष्णता व ॲसिडिटी कमी होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.