Buttermilk Benefits: जेवल्यानंतर छास का प्यावे? छास प्यायल्याने होतात हे ७ आरोग्यदायी फायदे

Shruti Vilas Kadam

पचनक्रिया सुधारते

छासामध्ये प्रोबायोटिक्स आणि चांगले बॅक्टेरिया असतात, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. जेवणानंतर छास प्यायल्याने अन्न सहज पचते.x

Buttermilk Benefits | Saam Tv

शरीराला थंडावा मिळतो

उन्हाळ्यात छास पिणे शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. त्यामुळे उकाड्यात ताजेतवाने वाटते आणि डिहायड्रेशनचा धोका कमी होतो.

Buttermilk Benefits

वजन नियंत्रणात राहण्यास मदत

छासामध्ये कॅलरीज कमी आणि पोषक घटक जास्त असतात. त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही.

Buttermilk | Google

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

छासामधील जीवनसत्त्वे, खनिजे आणि चांगले बॅक्टेरिया शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

Buttermilk | Google

अॅसिडिटीपासून आराम मिळतो

मसालेदार किंवा जड अन्न खाल्ल्यानंतर होणारी जळजळ आणि अॅसिडिटी कमी करण्यासाठी छास फायदेशीर ठरते.

Buttermilk | Google

हाडे मजबूत ठेवते

छासामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर महत्त्वाचे पोषक घटक असतात. हे हाडे आणि दात मजबूत ठेवण्यास मदत करतात.

Buttermilk | Google

त्वचेसाठीही फायदेशीर

शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत झाल्याने त्वचा निरोगी राहते. नियमित छास पिण्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येऊ शकते.

Buttermilk | Freepik

Green Saree Design: पहिल्या वटपौर्णिमेसाठी नव्या नवरीने ट्राय करा हिरव्या साडीचे ७ भरजरी आणि ट्रेंडी डिझाइन्स

Green Saree Design | Saam Tv
येथे क्लिक करा