Siddhi Hande
उन्हाळ्यात ताक पिणे हे शरीरासाठी खूप चांगलं असतं हे तर सर्वांनाच माहित आहे.
मात्र, ताक पिणे हे अमृत ठरु शकते. तुमच्या अनेक आजारांवर ताकामुळे फरक पडतो.
ताक कोणत्या पद्धतीने तयार करायचे, याचेही वेगवेगळे प्रकार आहेत.
ताक हे साय असलेल हवं की साय सोडून घ्यायचं, हे प्रत्येकाच्या शरीरानुसार ठरते. तुमच्या शरीरासाठी जे योग्य आहे तशा पद्धतीने तुम्ही ताक बनवू शकतात.
ताकामध्ये हिंग आणि मीठ मिसळून पिणे हे वातासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे वात बरा होऊ शकतो.
तुम्ही ताकात साखर किंवा गूळ टाकला तर त्याने पित्त कमी होते.
वेखंडासारखं चुर्ण टाकलं तर त्याने कफ नाहीसा होतो.