Manasvi Choudhary
आजकाल हँडमेड ज्वेलरीला महिलांची मोठी मागणी आहे. फॅशनेबल आणि युनिक पॅटर्नची ही ज्वेलरी आहे.
तुम्हालाही घरबसल्या बिझनेस सुरू करायचा असेल तर हँडमेड ज्वेलरीचा व्यवसाय सुरू करू शकता.
सिल्वर-ऑक्सिडाईज्ड आणि बिट्स ज्वेलरीसाठी तुम्ही रंगीबेरंगी मणी, मोती आणि ऑक्सिडाईज्ड पेंडंट्स वापरून नेकलेस आणि कानातले बनवा.
आजकाल साडी व कुर्तीवर मॅचिंग थ्रेड ज्वेलरी महिला व मुली घालतात यासाठी तुम्ही थ्रेड म्हणजेच रेशमी धाग्याची ज्वेलरी बनवू शकता.
मातीपासून तुम्ही कानातले, नेकलेस बनवून ते सुकवा. हा युनिक कानातल्यांचा प्रका आहे जो टेराकोटा आणि क्ले ज्वेलरी या नावाने ओळखला जातो.
हळदी-मेहंदीसाठी कापड आणि गोटा-पट्टी वापरून तयार केलेले दागिने तुम्ही निवडू शकता.