Shraddha Thik
अनेक वेळा घाईत आपण गरम पदार्थ खातो किंवा गरम पेय पितो आणि आपली जीभ भाजते.
गरम चहा प्यायल्याने जीभ भाजल्याचं तर अनेक जणांनी अनुभवलं असेल.
जीभ भाजली असेल तर दही खाणे फायदेशीर आहे. याच्या थंडावाने आराम मिळतो. म्हणून एक चमचा दही घ्या आणि काही वेळ तोंडात ठेवा.
चिमूटभर बेकिंग सोडा अनेक समस्यांवर उपाय आहे. त्याच्या एल्काइन नेचरमुळे खूप आराम मिळतो. यासाठी बेकिंग सोडा पाण्यात विरघळवून घ्या आणि नंतर गुळण्या करा.
जीभ भाजल्यावर त्वरित आराम मिळवण्यासाठी चिमूटभर साखर देखील खूप प्रभावी आहे. तोंडात साखर टाका आणि ती विरघळू द्या. असे केल्याने जळजळ आणि वेदनांपासून खूप आराम मिळेल.
मध चाटल्याने जिभेच्या जळजळीतही आराम मिळतो. कारण ते अँटीसेप्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे.
एलोवेरा जेल कूलिंग इफेक्ट प्रदान करते. त्याचे आइस क्यूब बनवा. हे अनेक समस्यांवर प्रभावी आहे.