Kitchen Hacks : हिरव्या मिरच्या कापल्यावर हातांची आगआग होते? मग फॉलो करा हे घरगुती उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिरव्या मिरच्या

हिरव्या मिरच्या कापल्यानंतर अनेकांना हाताला आग किंवा जळजळ होते. हि समस्या अनेक गृहिणींना स्वयंपाक करताना जाणवते.तर जाणून घ्या आग झाल्यास काय करावे.

Green Chili | GOOGLE

मिरचीमध्ये असलेले घटक

हिरव्या मिरचीत कॅप्सायसिन नावाचा एक रसायनिक घटक असतो. हाच घटक तिखटपणा निर्माण करतो आणि त्वचेला आग येण्यास कारणीभूत ठरतो.

Green Chili | GOOGLE

पाण्याने धुतल्यावर आग वाढते

कॅप्सायसिन पाण्यात विरघळत नाही. त्यामुळे मिरची कापल्यावर पाण्याने हात धुतल्यास आग कमी न होता उलट जास्त वाढते.

Green Chili | GOOGLE

आग झाल्यावर काय करावे?

हाताला आग झाल्यास सर्वात आधी थंड दूध किंवा दही हाताला लावा. हे लावल्याने कॅप्सायसिनचा प्रभाव कमी करण्यास मदत करते.

Green Chili | GOOGLE

तेलाचा वापर

हाताला थोडे नारळ तेल किंवा कोणतेही घरगुती तेल चोळा तेलामुळे कॅप्सायसिन विरघळते आणि आग कमी होते.

Green Chili | GOOGLE

लिंबू आणि व्हिनेगर

लिंबाचा रस किंवा व्हिनेगर लावल्यास आराम मिळतो. यातील आम्लीय घटक कॅप्सायसिनचा परिणाम कमी करतात.

Green Chili | GOOGLE

आग होऊ नये यासाठी खबरदारी

मिरच्या कापताना हाताला थोडे तेल लावल्यास आग होण्याचा धोका कमी होतो. तसेच हाताला कोरफडीचा गर सुध्दा लावू शकता.

Green Chili | GOOGLE

टिप

मिरच्या कापल्यानंतर डोळे, चेहरा किंवा नाकाला हात लावू नका. अन्यथा जास्त जळजळ होऊ शकते. योग्य काळजी घेतली तर ही समस्या टाळता येते.

Green Chili | GOOGLE

Kitchen Hacks : मसाले ओले होऊ नयेत म्हणून काय करावे? जाणून घ्या कमाल ट्रिक्स

Masale | GOOGLE
येथे क्लिक करा