ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदूधर्मात दररोज संध्याकाळी पूजा केली जाते. दररोज संध्याकाळी देवी लक्षमी आपल्या घरातील सर्व सदस्यांना आशिर्वाद देणायस येते.
मात्र त्यावेळी घर स्वच्छ आणि सकारात्मक उर्जा देणारं असलं पाहिजेल. ज्योतिषशास्त्रानुसार, तमालपत्र, लवंग आणि कापूर अतिशय शुभ मानले जातात.
घरातील आणि शरीरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी संध्याकाळी हा उपाय करा.
दररोज संध्याकाळी तमालपत्र, लवंग आणि कापूर एकत्र करून त्याचे दहन करा.
असे केल्यास तुमच्या घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते आणि घरातील वास्तू दोष देखील निघून जातो.
तमालपत्र, लवंग आणि कापूर एकत्र जाळल्यामुळे तुम्हाला देवी देवतांचा आशिर्वाद मिळतो.
हा उपाय केल्यास घरामधील मतभेद कमी होतात आणि त्यासोबतच सर्व सदस्यांचे नाते घट्ट होते.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.