Priya More
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे सुरतवर छापा टाकून ते लुटले. तसंच संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर लुटले होते.
शंभूराजे हिंदवी स्वराज्याच्या सिंहासनावर बसल्यानंतर अवघ्या १४ दिवसांत त्यांनी ही सर्वात मोठी यशस्वी लूट केली होती.
बुऱ्हाणपूर हे शहर मध्य प्रदेशात पूर्व निमर जिल्ह्यातील तापी नदीच्या किनाऱ्यावर बसले आहे.
त्याकाळात बुऱ्हाणपूर हे सोने, चांदी, हिरे, मोती, माणिक, हिरेजडीत दागिने, अत्तरे आणि वस्त्रे यांची मोठी बाजारपेठ होते.
३० जानेवारी १६८१ रोजी शंभूराजेंनी सेनापती हंबीररावांच्या नेतृत्वात ही यशस्वी लूट केली.
मराठ्यांनी बुऱ्हाणपूरातील सोने, चांदी, रत्ने, दागिने, किमती जिन्नस यांचा मोठा साठा लुटला. जमिनीखाली पुरलेली संपत्ती देखील मराठ्यांनी लुटली.
बुऱ्हाणपूरची लूट ही औरंगजेबाच्या जीवाला लागलेली सर्वात मोठी जखम होती.
मुघलांना धडा शिकवण्यासाठी आणि रयतेवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी त्यांनी बुऱ्हाणपूर लुटले.
शंभूराजेंच्या राज्याभिषेक सोहळ्यावर खूप खर्च झाला होता. त्यांना संपलेला पैसा आणि खजिना पुन्हा भरून काढायचा होता.
स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूरवर छापा टाकत खजिना लुटला.