ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतीय लोकांमध्ये रॉयल एनफिल्ड बाईक्सची खूप क्रेझ आहे. यामध्ये बुलेट ३५० ही बाईक लाोकांच्या आवडत्या बाईकपैकी एक आहे.
बुलेट ३५०चा सर्वात स्वस्त मिलिट्री रेड आणि मिलिट्री ब्लॅक व्हेरिंएट आहे.
रॉयल एनफिल्डची ही बाईक भारतीय सैन्यातही कार्यरत होती. यानंतर ती लोकांमध्ये अधिक लोकप्रिय झाली.
बुलेट ३५० ची सर्वात स्वस्त मॉडेल मिलिट्र्री लाल आणि काळ्या एक्स शोरुमची किंमत १, ७३,५६२ रूपये आहे.
बुलेट ३५०चा सर्वात महाग मॉडेल ब्लॅक गोल्ड म्हणजेच काळा आणि सोनेरी ची एक्स शोरुम किंमत २,१५, ८०१ रूपये आहे.
बुलेट ३५० मध्ये, सिंगल सिलेंडर, ४- स्ट्रोक, एअर ऑयल कूल्ड इंजिन आहे.
रॉयल एनफील्ड बाईकवरील इंजिन ६,१०० आरपीएमवर २०.२ बीएचपी पॉवर देते.