ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकजण फिट राहण्यासाठी मॉर्निंग वॉकला जातात. सकाळी उपाशी पोटी मॉर्निंग वॉक केल्याने पचनक्रिया सुधारते. तसेच आरोग्याला अनेक फायदे होतात.
तुम्हाला माहीत आहे का, सकाळी उपाशी पोटी वॉक करताना काही चुका केल्याने आपण अनेक आजारांना बळी पडू शकतो.
मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी पाणी न प्यायल्याने शरीर डिहायड्रेट होते. वॉकपूर्वी लिंबू पाणी किंवा कोमट पाणी पिणे फायदेशीर ठरेल.
मॉर्निंग वॉक केल्यानंतर लगेच नाश्त्यात तळलेले पदार्थ खाणे टाळा. याऐवजी हेल्दी आणि हलका नाश्ता करा.
रिकाम्या पोटी वॉक करताना खूप वेगाने चालणे किंवा अनियनितपणे चालण्याने हृदयाची गती असंतुलित होऊन लवकर थकवा येतो.
रिकाम्या पोटी खूप वेळ चालण्याने शरीरात उर्जेचा अभाव निर्माण होतो. किमान ३० ते ४० मिनिटे वॉक केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
चालताना शरीराची स्थिती योग्य असणे खूप महत्वाचे आहे. चुकीच्या पद्धतीने वॉक केल्याने गुडघे, कंबर आमि मानेवर ताण येऊ शकतो.