Surabhi Jayashree Jagdish
मुंबईमध्ये सुट्टी एन्जॉय करायची असेल तर जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. इथे अनेक सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणं आहेत जिथे तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये फिरू शकता. या विकेंडला तुम्ही कुठे फिरू शकता ते पाहा
गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईचं सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून इथे प्रवेश पूर्णपणे मोफत आहे. अरबी समुद्राच्या काठी बसून तुम्ही सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता आणि फोटो काढण्यासाठी हे ठिकाण खूप लोकप्रिय आहे.
गिरगाव चौपाटी हा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध बीच आहे. जिथे तुम्ही अगदी मोफत फिरू शकता. याठिकाणी भेळपुरी, पाणीपुरी, वडापाव सारखे स्ट्रीट फूड मिळतात, त्यामुळे खाण्याचाही आनंद घेता येतो.
हँगिंग गार्डन्स हे मलबार हिलवर स्थित एक सुंदर गार्डन आहे. ज्याठिकाणी उभं राहिल्यावर जिथून संपूर्ण मुंबईचं दृश्य दिसतं. याठिकाणी प्रवेश मोफत असल्यामुळे बजेट ट्रिपसाठी हे एक परफेक्ट ठिकाण आहे.
कान्हेरी गुंफा हे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. याठिकाणी कमी दरात प्रवेश मिळतो. प्राचीन बौद्ध गुंफा आणि निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळते, त्यामुळे इतिहास आणि निसर्ग दोन्ही अनुभवता येतात.
हे संग्रहालय इतिहास आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे आणि तिकीट दरही कमी आहे. याठिकाणी प्राचीन वस्तू, कला आणि इतिहासाशी संबंधित अनेक गोष्टी पाहायला मिळतात.
बाणगंगा टँक हे वॉकेश्वर परिसरातील एक शांत आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. येथे तुम्हाला मंदिरं, जुनी वास्तू आणि शांत वातावरण अनुभवायला मिळतं. कमी खर्चात आध्यात्मिक आणि शांत अनुभव घ्यायचा असेल तर हे ठिकाण नक्की भेट द्यावं.