Ruchika Jadhav
बौद्ध धर्माची स्थापना झाल्यानंतर भगवान गौतम बुद्ध यांनी आपल्या सर्व भंतिजींना धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
पावसाळ्यामध्ये सर्वत्र पाणी भरणे, पूर येणे अशा समस्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे धम्माच्या कामात अडथळा निर्माण होतो. त्या कालावधीला वर्षावास असं म्हणतात
वर्षावास सुरु झाल्यावर गौतम बुद्धांनी भंतिजींना कोणत्याही एकाच ठिकाणी थांबून उपासक आणि उपासिकांना आपल्या धम्माविषयी माहिती देण्याचे आदेश दिले होते.
वर्षावासाचा कालावधी ३ महिन्यांचा असून आषाढ पौर्णीमा ते आश्विन पौर्णिमापर्यंत वर्षावास सुरू असतो.
या काळात सर्व उपासक आणि उपासिकांनी भंतिजींना आपल्या घरी बोलावून त्यांना भोजन दान द्यावे. तसेच अष्टांगिक मार्ग आणि पंचशीलेचे पालन करणे गरजेचे असते.
वर्षावास आषाढ पौर्णिमेपासून सुरु होतो आणि आषाढ पौर्णिमा २१ जुलैपासून सुरू होत आहे.
आश्विन पौर्णिमेला वर्षावास संपतो. यावर्षी आश्विन पौर्णिमा १७ ऑक्टोबर रोजी आली आहे.
वर्षभर धम्म प्रसारात व्यस्त असलेल्या भंतिजींची सेवा करण्यासाठी हा उत्तम काळ असतो.
Swing at Home: घरात झोका बांधणे शुभ की अशुभ