Shruti Vilas Kadam
BSNL चा हा विशेष First Recharge Coupon (FRC) आहे. म्हणजेच नवीन BSNL SIM घेणाऱ्या ग्राहकांसाठीच हा प्लॅन उपलब्ध आहे.
या प्लॅनची वैधता २४ दिवसांची आहे. त्यामुळे नवीन SIM घेणाऱ्या ग्राहकांना केवळ १ रुपयात जवळपास २४ दिवस सेवा वापरण्याची सुविधा मिळते.
प्लॅनमध्ये दररोज १GB इंटरनेट डेटा मिळतो. म्हणजेच २४ दिवसांच्या वैधतेमध्ये एकूण २४GB डेटा वापरता येतो.
इंटरनेटसोबत ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा लाभ मिळतो. त्यामुळे वैधता कालावधीत कॉलिंगसाठी स्वतंत्र व्हॉइस रिचार्जची गरज नसते.
या प्लॅनमध्ये दररोज १०० SMS देखील मिळतात. २४ दिवसांच्या कालावधीत एकूण २,४०० SMSपर्यंतचा लाभ मिळू शकतो.
NDTVच्या वृत्तानुसार, हा प्लॅन विशेषतः सेकंडरी SIM सक्रिय ठेवू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी उपयुक्त ठरू शकतो. मात्र, हा लाभ नवीन BSNL ग्राहकांसाठीच आहे.
महत्त्वाचे म्हणजे हा FRC प्लॅन केवळ नवीन BSNL SIM घेणाऱ्यांसाठी आहे. जुन्या BSNL नंबरवर हा १ रुपयांचा प्लॅन पुन्हा लागू करता येत नाही. त्यासाठी नियमित प्रीपेड प्लॅनमधून रिचार्ज करावा लागतो.