Freedom Offer: १ रुपयाच्या रिचार्जमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉल अन् 60GB डेटा, ३० दिवस चालणार

Dhanshri Shintre

प्लॅनचे फायदे

बीएसएनएलने अवघ्या १ रुपयात स्वातंत्र्य प्लॅन सादर केला आहे. लिमिटेड टाईम फ्रीडम ऑफर अंतर्गत मिळणाऱ्या या प्लॅनचे फायदे जाणून घ्या.

प्रमोशनल ऑफर

बीएसएनएलने अवघ्या १ रुपयात प्रीपेड प्लॅन प्रमोशनल ऑफर अंतर्गत ग्राहकांसाठी लॉन्च केला आहे.

कधीपर्यंत चालू आहे?

कंपनीनुसार, ही फ्रीडम ऑफर ३१ ऑगस्टपर्यंत मर्यादित असून, ग्राहकांना बीएसएनएलच्या ४जी नेटवर्कचा अनुभव घेण्याची संधी दिली जात आहे.

किती दिवस मिळणार?

बीएसएनएलच्या १ रुपयाच्या प्लॅनमध्ये ३० दिवस वैधता, दररोज २ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते.

डेटा किती मिळेल?

या प्लॅनमध्ये रोज २ जीबी प्रमाणे एकूण ६० जीबी ४जी डेटा दिला जातो, जो ग्राहकांना वापरता येईल.

इंटरनेट स्पीड

बीएसएनएलच्या FUP पॉलिसीनुसार, ग्राहकांचा दररोजचा डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड ४० केबीपीएसपर्यंत घटतो आणि पुढील वापर मर्यादित होतो.

फ्रीडम ऑफर

बीएसएनएलची फ्रीडम ऑफर केवळ नवीन ग्राहकांसाठी लागू आहे, सध्याचे ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

4G सिम मोफत

कंपनी या प्लॅनसह ग्राहकांना मोफत 4G सिम देत आहे, मात्र डोअरस्टेप डिलिव्हरी सेवेसाठी ही ऑफर लागू होईल का हे स्पष्ट नाही.

सर्व्हिस सेंटर

बीएसएनएलच्या आझादी का योजनेचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांनी जवळच्या बीएसएनएल रिटेलर किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊन रिचार्ज करावे लागेल.

वेबसाइट किंवा सेल्फकेअर अ‍ॅप

ग्राहक बीएसएनएलच्या वेबसाइट किंवा सेल्फकेअर अ‍ॅपवरूनही या योजनेविषयी माहिती मिळवू शकतात.

NEXT: वर्षभर सिम कार्ड अ‍ॅक्टिव्ह ठेवा, हे आहेत Airtel, Jio आणि Vi चे किफायतशीर प्लॅन्स

येथे क्लिक करा