Brownies Recipe : अंड्याशिवाय बनवा मऊ, टेस्टी चॉकलेटी ब्राउनी, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

लागणारे साहित्य

1 कप मैदा, ½ कप कोको पावडर, 1 कप साखर, ½ कप वितळलेले बटर, 1 कप दूध, 1 चमचा व्हॅनिला इसेन्स, 1 चमचा बेकिंग पावडर आणि चॉकलेट चिप्स.

Chocolate Brownie Recipe | Saam Tv

कोरडे साहित्य एकत्र करा

एका भांड्यात मैदा, कोको पावडर आणि बेकिंग पावडर चाळून घ्या. त्यामुळे मिश्रण हलके आणि गुठळीरहित होते.

Chocolate Brownie Recipe | Saam Tv

साहित्य तयार करा

दुसऱ्या भांड्यात वितळलेले बटर, साखर, दूध आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र करून चांगले फेटून घ्या.

Chocolate Brownie Recipe | Saam tv

बॅटर तयार करा

कोरडे साहित्य ओल्या मिश्रणात हळूहळू घाला आणि गुळगुळीत बॅटर तयार करा. शेवटी चॉकलेट चिप्स मिसळा.

Chocolate Brownie Recipe | Saam Tv

बेकिंग ट्रे तयार करा

बेकिंग ट्रेला बटर लावून ग्रीस करा किंवा बटर पेपर लावा. तयार बॅटर ट्रेमध्ये समान पसरवा.

Chocolate Brownie Recipe | Saam Tv

ब्राउनी बेक करा

ओव्हन 180°C वर प्रीहीट करा. ब्राउनी 25 ते 30 मिनिटे बेक करा. टूथपिक घालून शिजल्याची खात्री करा.

Chocolate Brownie Recipe | Saam Tv

थंड करून सर्व्ह करा

ब्राउनी पूर्णपणे थंड झाल्यावर चौकोनी तुकडे कापा. वरून चॉकलेट सॉस, आईस्क्रीम किंवा ड्रायफ्रूट्स घालून सर्व्ह करा.

Christmas 2024 | SAAM TV

Skin care: दररोज सनस्क्रीन लावूनही चेहऱ्यावर टॅनिंग होत आहे? त्वचारोगतज्ज्ञांकडून जाणून घ्या याचे 5 कारण

Sunscreen
येथे क्लिक करा