Manasvi Choudhary
भारतीय सौंदर्याचे खरे वैशिष्ट्य म्हणजे सावळा रंग, सावळ्या रंगाचे व्यक्तिमत्व हे आकर्षक आणि प्रभाव पाडणारे असते.
मात्र अनेकांना सावळ्या रंगावर नेमका कसा लूक करायचा हे समजत नाही. यासाठी आज आम्ही सावळ्या रंगावर कोणती लिपस्टिक शेड्स सुट होतील हे सांगणार आहोत.
कॉफी ब्राऊन लिपस्टिक ही सावळ्या रंगावर अधिक उठून दिसते. ऑफिस आणि हेली युजसाठी हा लिपस्टिक कलर बेस्ट आहे.
सावळ्या रंगाच्या महिलांवर 'वाईन' किंवा 'डार्क प्लम' शेड्स सुंदर दिसतात. या लूकमुळे चेहऱ्यावर तेज येतो आकर्षण वाढते.
उन्हाळ्यात किंवा दिवसा बाहेर जाताना मरूम रंगाची लिपस्टिक तुम्ही निवडू शकता हा रंग सावळ्या त्वचेवर उठून दिसतो.
दिवसा 'मॅट' लिपस्टिक वापरा आणि रात्रीच्या वेळी थोडे 'ग्लॉस' लावल्यास ओठ अधिक आकर्षक दिसतील.
सावळ्या त्वचेवर लिपस्टिक लावण्यापूर्वी डार्क ब्राऊन किंवा मरून लिप लायनरने ओठांना आउटलाईन करा, यामुळे लिपस्टिक अधिक उठून दिसते.