Manasvi Choudhary
सकाळी नाश्त्याला हलके आणि पौष्टिक खायचे असेल तर ब्रोकोली सूप ही रेसिपी बनवू शकता.
ब्रोकोली सूप बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही सोप्या पद्धतीने घरी ब्रोकोली सूप बनवू शकता.
ब्रोकोली सूप बनवण्यासाठी ब्रोकोली, कांदा, लसूण, दूध, मिरी पावडर, बटर, मीठ साहित्य एकत्र करा.
एका कढईत बटर किंवा तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेला लसूण आणि कांदा टाकून गुलाबी रंग येईपर्यंत परता.
आता या संपूर्ण मिश्रणात बारीक चिरलेली ब्रोकोली टाका आणि चांगली परतून घ्या.
शिजवलेले मिश्रण गॅसवरून उतरवा आणि पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झालेले मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून त्याची एकसारखी मऊ प्युरी बनवून घ्या.
ही प्युरी पुन्हा कढईत काढा. त्यात दूध, चवीनुसार मीठ आणि मिरी पावडर घाला.
सूपला एक उकळी येऊ द्या. तुमचे गरमागरम आणि आरोग्यदायी ब्रोकोली सूप तयार आहे!