Shruti Vilas Kadam
लग्नानंतर विविध समारंभ, पूजा आणि कौटुंबिक कार्यक्रमांसाठी सिल्क साड्या, नऊवारी, डिझायनर साड्या आणि सलवार सूट ठेवणे आवश्यक आहे.
सोन्याचे दागिने (मंगलसूत्र, चैन, कानातले, बांगड्या) आणि फॅशन ज्वेलरी दोन्ही हव्यात, कारण वेगवेगळ्या ड्रेसला वेगवेगळ्या ज्वेलरीची गरज भासते.
रेडीमेड पार्टी वेअर, गाऊन, कुर्ता-शरारा, लहंगा किंवा फ्यूजन आउटफिट्स ठेवले तर लग्नानंतरच्या पार्ट्यांसाठी तयारी होते.
लिपस्टिक, काजळ, फाउंडेशन, कंसीलर, कॉम्पॅक्ट, स्किनकेअर क्रीम्स, नाईट क्रीम, परफ्यूम, हेअर सिरम असे प्रॉडक्ट्स नेहमी कपाटात असावेत.
हील्स, वेजेस, जुत्ती, फ्लॅट चप्पल, कोल्हापुरी यांचे मिश्रण असलेले एक छोटं फुटवेअर कलेक्शन असणे गरजेचे आहे.
सोयीस्कर ब्रा, कंफर्टेबल पँटीज, नाईटवेअर आणि आवश्यक असेल तर शेपवेअर या गोष्टी नव्या नवरीसाठी दैनंदिन वापरात महत्त्वाच्या ठरतात.
अधिकतर मुलींंना लग्नात किंवा लग्नानंतर हॉर्मोनल चेंजमुळे पिरियड्स येतात. तर अशावेळी कपाटात सेनेटरी पॅड असणे सर्वात आवश्यक असते.