Shruti Vilas Kadam
दागिने खरेदी करण्यापूर्वी आपला बजेट ठरवा. त्यामुळे ओव्हरस्पेंडिंग होणार नाही आणि योग्य पर्याय निवडणे सोपे जाते.
दागिने घेताना 22K किंवा 18K सोनं घ्यायचं आहे का हे ठरवा. BIS Hallmark असलेले दागिनेच खरेदी करावेत.
दागिन्यांचे वजन, मजबुती आणि वापर किती वेळा होणार आहे हे पाहून डिझाईन निवडा. खूप जड दागिने लग्नानंतर वापरले जात नाहीत.
खरेदी केलेल्या दागिने सोन्याचे असतील तर प्रत्येक दागिन्याचे प्रमाणपत्र, वजन, कॅरेट आणि चार्जेस नमूद असलेलं बिल अवश्य घ्या.
प्रत्येक ज्वेलरचे मेकिंग चार्जेस वेगवेगळे असतात. खरेदी करण्यापूर्वी वेस्टेज आणि मेकिंग चार्जेसची तुलना करा.
भविष्यात दागिने बदलायचे असतील तर त्या ज्वेलरची एक्सचेंज आणि बायबॅक पॉलिसी महत्त्वाची असते. ती नीट वाचा आणि समजून घ्या.
लग्नात आकर्षक दिसण्यासाठी डिझाइन महत्त्वाचे आहे, पण त्याबरोबरच कम्फर्टही तितकाच महत्त्वाचा आहे. खूप नाजूक किंवा सहज तुटणारे दागिने टाळा.