Manasvi Choudhary
लग्नात रिस्पेशनसाठी डिझायनर साडी निवडली जाते. पारंपारिक ते मॉडर्न लूकसाठी लेटेस्ट पॅटर्नच्या साड्या खास ट्रेडिंगमध्ये आहे.
तुम्हालाही रिस्पेशनसाठी खास साडी खरेदी करायची असेल तर तुम्ही या पॅटर्नच्या साड्या निवडू शकता.
साडीवर पूर्णपणे बारीक चमकणारे सेक्विन टिकल्या असतात यामुळे नवरीचा लूक उठून दिसतो. सिक्विन साडी सध्य ट्रेडिंगमध्ये आहे.
जर तुम्हाला साडी नेसण्याचा आणि ती सावरण्याचा ताण नको असेल, तर तुम्ही प्री-ड्रेप्ड 'रेडी-टू-वेअर' साडी लूक देखील करू शकता.
ऑर्गेंझा साड्यांची महिलांना क्रेझ असते. पेस्टल रंगाच्या ट्रान्सपरंट साडीला ४-५ इंचाची मोठी जरदोजी किंवा मोत्यांची बॉर्डर असते. ही साडी तुम्ही खास निवडू शकता.
गडद वाईन, नेव्ही ब्लू किंवा एमराल्ड ग्रीन रंगाच्या वेलवेट साडी तुम्ही निवडू शकता यामध्ये लूक उठून दिसतो.
सध्या गोल्ड, सिल्व्हर आणि कॉपर रंगाच्या मेटॅलिक साड्यांची मोठी क्रेझ आहे. ही साडी फॅशनेबल असते.