Bridal Beauty Kit: नवरीच्या मेकअप किटमध्ये काय असावं? लग्नाच्या दिवशी उपयोगी पडतील या ७ गोष्टी

Shruti Vilas Kadam

स्किन केअर प्रोडक्ट्स

नवरीच्या किटमध्ये मॉइश्चरायझर, लिप बाम, हायड्रेटिंग मिस्ट आणि अंडर-आय पॅच ठेवा. यामुळे त्वचेची नियमित काळजी घेता येईल आणि चेहऱ्याचा कोरडेपणा कमी होईल.

Bride Look

मेकअप टच-अप किट

लिपस्टिक, कन्सीलर, ब्लश, ट्रान्सलुसेंट पावडर आणि मेकअप फिक्सिंग स्प्रेसोबत ठेवा.

Bride Look | Saam tv

हेअरस्टाइलसाठी आवश्यक साहित्य

बॉबी पिन्स, जुडा पिन्स, रबर बँड, छोटी कंगवी, हेअर नेट आणि हेअर स्प्रे ठेवा. पदर किंवा ओढणी सांभाळताना किंवा हेअरस्टाइल बिघडल्यास याचा वापर होतो.

Bride Look | Saam Tv

सेफ्टी पिन आणि शिवणकामाचे साहित्य

ब्लाउज, लेहेंगा किंवा साडीची घडी सांभाळण्यासाठी सेफ्टी पिन, सुई-दोरा आणि छोटी कात्री सोबत ठेवा. कपड्यांमध्ये ऐनवेळी काही बिघाड झाल्यास त्याचा उपयोग होईल.

Bride

ज्वेलरी आणि फॅशन टेप

बॉडी टेप, डबल-साइडेड टेप आणि कानातले, टिकली ठेवा. दागिने किंवा कपडे व्यवस्थित जागेवर राहण्यासाठी यांची मदत होऊ शकते.

Bride | Saam Tv

टिश्यू, कॉटन आणि ब्लॉटिंग पेपर

घाम, तेलकटपणा किंवा पसरलेला काजळ व्यवस्थित करण्यासाठी टिश्यू, कॉटन आणि कॉटन बड्स सोबत ठेवा. तेलकट त्वचा असल्यास ब्लॉटिंग पेपर उपयोगी ठरू शकतो.

Bride's Bridal Glow | pinterest

पाणी, हलका खाऊ

लग्नाच्या धावपळीत पाणी, एनर्जी बार किंवा ड्रायफ्रूट्स जवळ ठेवा. छोटा हातपंखा आणि आवश्यक वैयक्तिक वस्तूही बॅगेत ठेवा.

Bride

Saree Draping Styles: कॉलेजपासून पार्टीपर्यंत दिसा स्टायलिश! या ७ साडी ड्रेपिंग स्टाइल्स करतील तुमचा लूक खास

Saree Draping Styles | Saam Tv
येथे क्लिक करा