Shruti Vilas Kadam
ब्राइडल किटमध्ये हायड्रेटिंग मिस्ट, जेल-बेस्ड मॉइश्चरायझर आणि लिप बाम नक्की ठेवा. यामुळे त्वचेला ताजेपणा मिळण्यास आणि कोरडेपणा कमी करण्यास मदत होऊ शकते.
लग्नाच्या कार्यक्रमांमधील थकव्यामुळे डोळ्यांखाली सूज किंवा काळी वर्तुळे दिसू शकतात. त्यामुळे आई पॅच किंवा आई क्रीम किटमध्ये ठेवल्यास ऐनवेळी उपयोग होऊ शकतो.
लास्ट-मिनिट ग्लोसाठी त्वचेच्या प्रकारानुसार शीट मास्क निवडा. कोरड्या त्वचेसाठी हायलुरॉनिक अॅसिड, डल स्किनसाठी राइस वॉटर किंवा व्हिटॅमिन-C आणि ऑयली स्किनसाठी नियासिनामाइड किंवा ग्रीन टी असलेला मास्क वापरता येतो.
ब्लोटिंग पेपर, क्यू-टिप, ट्रान्सलुसेंट पावडर, मेकअप फिक्सर, ब्लश, लिपस्टिक आणि तुमच्या स्किन टोनचा कन्सीलर किटमध्ये ठेवा. मेकअप खराब झाल्यास यामुळे पटकन टचअप करता येईल.
लग्नाच्या विधींमध्ये किंवा कपडे बदलताना हेअरस्टाइल विस्कटू शकते. त्यामुळे बॉबी पिन, जूडा पिन, रबर बँड, छोटा कंगवा, हेअर नेट आणि हेअर स्प्रे सोबत ठेवा.
सेफ्टी पिन, नेल ग्लू, आयलॅश ग्लू, बॉडी टेप, मांगटिक्यासाठी डबल-साइडेड टेप आणि सुई-दोरा यांसारख्या वस्तू ब्राइडल किटमध्ये ठेवा. ऐनवेळी छोट्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो.
छोटा हँड फॅन, चॉकलेट, एनर्जी बार किंवा सुका मेवा आणि इलेक्ट्रोलाइट ड्रिंक यांसारख्या गोष्टी सोबत ठेवल्यास लग्नाच्या धावपळीत उपयोग होऊ शकतो. नियमित औषधे असल्यास तीही सोबत ठेवावीत.