Shruti Vilas Kadam
या उपायासाठी सर्वप्रथम नारळाचे तेल थोडे कोमट करा. तेल खूप गरम करू नये. कोमट तेलामुळे मिश्रण स्कॅल्पवर सहज लावता येते.
तुरटी बारीक करून त्याची पावडर तयार करा आणि ती कोमट नारळाच्या तेलात व्यवस्थित मिसळा. हे मिश्रण स्कॅल्पवर लावण्यासाठी तयार होईल.
मिश्रण थोडे थंड झाल्यानंतर ते केसांच्या मुळांजवळ आणि स्कॅल्पवर लावा. बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने मसाज करा. यामुळे स्कॅल्पवरील अतिरिक्त तेलकटपणा आणि घाण कमी करण्यास मदत होऊ शकते.
तुरटी आणि नारळाच्या तेलाचे मिश्रण स्कॅल्पवर सुमारे ३० मिनिटे राहू द्या. त्यानंतर केस माइल्ड शॅम्पूने स्वच्छ धुवा.
तुरटीमध्ये अँटीसेप्टिक आणि अॅस्ट्रिंजंट गुण असल्याचे या लेखात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे स्कॅल्प स्वच्छ ठेवण्यास आणि डँड्रफ व सौम्य खाज कमी करण्यास मदत होऊ शकते.
तुरटीचा थेट वापर केल्यास काही लोकांची टाळू अधिक कोरडी होऊ शकते. त्यामुळे नारळाच्या तेलासोबत त्याचा वापर केला जातो. नारळाचे तेल केस आणि स्कॅल्पला मॉइश्चर देण्यास मदत करू शकते.
तुरटी प्रत्येकाच्या स्कॅल्पला सूट होईलच असे नाही. त्यामुळे प्रथम छोट्या भागावर पॅच टेस्ट करा. जळजळ, लालसरपणा किंवा खाज वाढल्यास वापर थांबवा. हा उपाय आठवड्यातून १-२ वेळाच करावा. डँड्रफ कायम राहिल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.