Sleeping : रात्री झोपेत अचानक श्वास कोंडल्यासारखे होऊन जाग येते? शरीर देतेय 'या' गंभीर आजाराचे संकेत

Shreya Maskar

रात्री झोपेत श्वास कोंडतो

रात्री शांत झोपेत असताना अचानक श्वास घ्यायला त्रास होणे, गुदमरल्यासारखे वाटणे किंवा धाप लागल्यामुळे जाग येणे असे अनेकांसोबत होते. यामागचे नेमकं कारण काय, जाणून घेऊयात.

Shortness of breath during sleep at night | google

तज्ज्ञांचे मत

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, झोपेच्या दरम्यान श्वासोच्छवासाच्या समस्या सामान्यतः स्लीप ॲप्नियाचे लक्षण आहे.

Expert opinion | google

स्लीप ॲप्निया

झोपेत श्वसनमार्ग अरुंद किंवा बंद झाल्यामुळे काही काळ श्वास थांबू शकतो. त्यामुळे व्यक्तीला अचानक गुदमरल्यासारखे वाटून जाग येते. मोठ्याने घोरणे, झोपेत धाप लागणे आणि दिवसा सतत थकवा जाणवणे ही याची सामान्य लक्षणे आहेत.

Sleep apnea | google

हृदयाशी संबंधित समस्या

हृदयाची पंप करण्याची क्षमता कमी झाल्यास फुफ्फुसांमध्ये द्रव साचू शकतो. अशा वेळी झोपेतून अचानक धाप लागून जाग येऊ शकते.

Heart related problems | google

अ‍ॅसिड रिफ्लक्स

पोटातील आम्ल अन्ननलिकेत किंवा घशाकडे परत आल्यामुळे जळजळ, आंबट ढेकर, खोकला किंवा घशात अडथळा आल्यासारखे वाटू शकते. विशेषतः जेवल्यानंतर लगेच झोपल्यास त्रास वाढू शकतो.

Acid reflux | google

फुफ्फुसांशी संबंधित आजार

श्वसनमार्गाचा संसर्ग, दीर्घकालीन फुफ्फुसांचे आजार किंवा इतर श्वसनविकारांमुळे रात्री धाप लागू शकते. त्यामुळे फुफ्फुसाचे आजार असणाऱ्या लोकांनी सावध रहावे.

Diseases related to the lungs | google

दमा

दम्यामुळे रात्री खोकला, छातीत आवळल्यासारखे वाटणे, घरघर आणि श्वास सोडताना त्रास होऊ शकतो.

Asthma | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | google

NEXT : लाल की हिरवं? रोज कोणतं सफरचंद खाणं आरोग्यासाठी फायदेशीर?

Green vs Red Apple | AI PHOTO
येथे क्लिक करा...