Breakfast: नाश्त्याची चिंता मिटली! सोमवार ते रविवारच्या प्रत्येक दिवसासाठी खास ब्रेकफास्ट मेनू

Dhanshri Shintre

स्वादिष्ट पदार्थ

आठवड्याच्या प्रत्येक दिवसासाठी नाश्त्यात काय बनवायचं, हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही खास सात दिवसांचे सोपे आणि स्वादिष्ट पर्याय दिले आहेत.

Breakfast | Freepik

सोमवारी मूग डाळ दलिया

मूग डाळीचं दलिया नाश्त्यात खा, पोट हलकं राहतं आणि शरीराला भरपूर प्रथिने मिळतात.

Moong Dal Daliya | Freepik

मंगळवारी मूग दाल चिल्ला

मूग डाळ चिल्ला लवकर तयार होतो. पनीर भरुन ते अधिक पौष्टिक बनवा आणि नारळाची किंवा पुदिन्याची चटणीसोबत खावा.

Moong Dal Chilla | Freepik

बुधवारी पोहे

मोहरीच्या तेलात भिजवलेले पोहे, कांदा, कढीपत्ता, मोहरी व मसाले घालून तयार करा आणि लिंबाचा रस पिळून स्वादिष्ट नाश्ता सर्व्ह करा.

Pohe | Freepik

गुरुवारी उपमा

रव्याचा उपमा किंवा पुडिंगमध्ये रंगीबेरंगी भाज्या घालून तो अधिक पोषणमूल्यपूर्ण बनतो, आणि केवळ १० मिनिटांत तयार होतो.

Upma | Freepik

शुक्रवारी इडली

रव्याच्या इडलीसाठी दह्यात बेकिंग सोडा घालावा, त्यामुळे इडली मऊ फुलते. मस्त स्वादिष्ट चटणीसोबत त्याचा आनंद घ्या.

Idli | Freepik

शनिवारी बेसनाचा पोळा

बेसनाचा चिल्ला हा झटपट तयार होणारा पारंपरिक नाश्ता आहे, जो पुदिना किंवा टोमॅटो चटणीसोबत खास चव देतो आणि सर्वांना आवडतो.

Besan Pola | Freepik

रविवारी उत्तपम

रव्याचं इडली पीठ नॉन-स्टिक तव्यावर थापून शिजवा, वर आवडत्या भाज्या घाला आणि मसालेदार चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.

Uttapam | Freepik

NEXT: फक्त पन्हं आणि लोणचं नव्हे! कैरीपासून बनवा 'हे' भन्नाट आणि स्वादिष्ट पदार्थ

येथे क्लिक करा