Manasvi Choudhary
रवा उपमा हा पौष्टिक नाश्ता आहे.
रवा उपमा बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
रवा उपमा बनवण्यासाठी रवा, मीठ, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, मिरची, जिरे, मोहरी हे साहित्य घ्या.
प्रथम एका पॅनमध्ये थोडे तेल घालून गॅसवर रवा थोडा भाजून घ्या,
नंतर दुसऱ्या भांड्यात गरम तेलामध्ये जिरे, मोहरीची फोडणी द्या.
नंतर या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, मिरची, टोमॅटो हे घाला.
या संपूर्ण मिश्रणात साखर,मीठ,हळद घालून १ ग्लास पाणी घालून, पाण्याला उकळी येवू द्या
छान उकळी आली की त्यात रवा घालायचा. आता मिश्रण छान एकजीव करून शिजून घ्या.
नंतर एका प्लेट मध्ये उपमा घेऊन वरून कोथिंबीर घाला अशाप्रकारे रवा उपमा खाण्यासाठी तयार आहे.