ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ऑफिसमधून थकलेल्या सर्वांना एखादी वेगळी आणि मजेशीर गोष्ट अनुभवायची इच्छा असते.
अशावेळी तुम्ही घरच्या घरी ब्रेड पिझ्झा बनवून खाऊ शकता. चला जाणून घ्या सोपी रेसिपी.
ब्रेडचे स्लाइस, पिझ्झा सॉस, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, उकडलेले स्वीट कॉर्न, मोझरेला चीज, मीठ, काळी मिरी पावडर, रेड चिली फ्लेक्स.
एका भांड्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, स्वीट कॉर्न, मीठ आणि काळी मिरी पावडर एकत्र करा.
ब्रेडच्या प्रत्येक स्लाईसवर पिझ्झा सॉस लावा. सॉस लावलेल्या ब्रेडवर तयार भाज्यांचे मिश्रण पसरवा. मिश्रणावर किसलेले मोझरेला चीज भरपूर घाला.
तुम्ही यावर काळे ऑलिव्स किंवा तुमच्या आवडीच्या इतर भाज्या घालू शकता.
तुम्ही यावर काळे ऑलिव्स किंवा तुमच्या आवडीच्या इतर भाज्या घालू शकता.
तयार आहे आपला ब्रेड पिझ्झा. गरमागरम पिझ्झा सॉससह सर्व्ह करा आणि त्याचा चविष्ट अनुभव घ्या.