Shreya Maskar
नाश्त्याला घरीच सिंपल पद्धतीने ब्रेड गार्लिक स्टिक बनवा.
ब्रेड गार्लिक स्टिक बनवण्यासाठी ब्रेड स्लाइस, चिली फ्लेक्स, लसूण पेस्ट, मिक्स हर्ब्स, चाट मसाला, काळे मीठ, पुदिना पावडर आणि तूप इत्यादी साहित्य लागते.
ब्रेड गार्लिक स्टिक बनवण्यासाठी सर्वप्रथम ब्रेडचे उभे स्टिक कापून घ्या.
एका बाऊलमध्ये चिली फ्लेक्स, लसूण पेस्ट, मिक्स हर्ब्स, चाट मसाला, काळे मीठ, पुदिना पावडर आणि तूप यांचे मिश्रण करून घ्या.
आता ब्रेडची स्टिक घेऊन त्याला एका बाजूने मसाल्याचे मिश्रण लावून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात ब्रेड गार्लिक स्टिक शॅलो फ्राय करून घ्या.
पावसाळ्यात गरमागरम कॉफीसोबत ब्रेड गार्लिक स्टिकचा आस्वाद घ्या.
ब्रेड गार्लिक स्टिक तुम्ही चीज डीपसोबत देखील खाऊ शकता.