Brain Stroke : ब्रेन स्ट्रोक येण्याआधी शरीर देते 'हे' ५ संकेत, वेळीच सावध झालात तर वाचू शकतो जीव!

Shreya Maskar

ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय?

ब्रेन स्ट्रोक ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे, जी मेंदूच्या कोणत्याही भागाला होणारा रक्तपुरवठा थांबल्यास किंवा खंडित झाल्यास उद्भवते. ब्रेन स्ट्रोकमध्ये ऑक्सिजन, रक्त आणि पोषक घटक कमी होतात, ज्यामुळे मेंदूच्या पेशी काही मिनिटांतच मरतात.

What is a Brain Stroke? | pinterest

रक्तवाहिन्या

रक्तवाहिनी फुटून होणारा रक्तस्राव होणे आणि रक्ताची गुठळी किंवा ब्लॉकेजमुळे रक्तप्रवाह थांबतो, ज्यामुळे मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन मिळत नाही आणि ब्रेन स्ट्रोकची समस्या उद्भवते.

Blood Vessels | pinterest

तोल जातो

संतुलन (Balance) अचानक तोल जाण किंवा समन्वय बिघडणे. डोळे (Eyes)- एका किंवा दोन्ही डोळ्यांनी अचानक पाहण्यास अडचण येणे, किंवा दुहेरी दृष्टी दिसणे.

Balance | pinterest

अशक्तपणा

चेहरा (Face) हसताना चेहऱ्याची एक बाजू खाली झुकणे किंवा सुन्न वाटणे. हात (Arms ) एका हातात अशक्तपणा किंवा सुन्नपणा जाणवणे. हात वर उचलल्यास तो खाली झुकतो.

Weakness | pinterest

अस्पष्ट उच्चार

बोलणे (Speech) शब्द अस्पष्ट उच्चारणे, बोलणे अस्पष्ट होणे किंवा बोलणे समजण्यास अडचण येणे. वेळ (Time) ही लक्षणे दिसल्यास तात्काळ आपत्कालीन सेवांना कॉल करा.

Speech | pinterest

गंभीर डोकेदुखी

अचानक, खूप वेदनादायक डोकेदुखी होणे. वारंवार डोके दुखणे हे गंभीर लक्षण आहे. सामान्य औषधे घेऊन ही डोकेदुखी कमी होत नाही.

Severe Headache | pinterest

इतर लक्षणे

अचानक चालताना त्रास होणे, चक्कर येणे. तसेच मानसिक आरोग्य देखील बिघडते. मेंदूवर जास्त ताण देणे टाळा.

Other Symptoms | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Brain Stroke | yandex

NEXT : मेंदूतील रक्तवाहिन्या फुटण्याआधी शरीर देतं 'हे' संकेत, वेळीच ओळखा नाहीतर...

Brain Hemorrhage | AI PHOTO
येथे क्लिक करा...