Brain Hemorrhage : मेंदूतील रक्तवाहिन्या फुटण्याआधी शरीर देतं 'हे' संकेत, वेळीच ओळखा नाहीतर...

Shreya Maskar

ब्रेन हॅमरेज म्हणजे काय?

ब्रेन हॅमरेज म्हणजे मेंदूमध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला होणारा रक्तस्राव होय. जेव्हा मेंदूतील एखादी रक्तवाहिनी कमकुवत होऊन फुटते तेव्हा कवटीच्या आत रक्त जमा होते. यामुळे मेंदूवरील दाब वाढतो, ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होतो आणि मेंदूच्या पेशी नष्ट होऊ लागतात.

What is brain hemorrhage? | pinterest

अचानक तीव्र डोकेदुखी

तीव्र डोकेदुखी हे ब्रेन हॅमरेजचे सुरुवातीचे सामान्य लक्षण आहे. अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात. वारंवार डोके दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

headache | pinterest

अशक्तपणा

शरीराच्या एका बाजूला चेहरा, हात किंवा पायावर अचानक बधिरता, मुंग्या येणे किंवा अर्धांगवायू होणे. शरीर अशक्त होते.

Weakness | pinterest

बोलताना अडचण

अस्पष्ट बोलणे, शब्द शोधण्यात अडचण येणे, किंवा साधी वाक्ये समजण्यात अचानक गोंधळ होणे. तसेच एखादी बोललेली किंवा सांगितलेली गोष्ट पटकन समजत नाही.

Difficulty speaking | pinterest

दृष्टीदोष

अचानक अंधुक दिसणे, दुहेरी दिसणे, किंवा एका किंवा दोन्ही डोळ्यांची दृष्टी पूर्णपणे जाणे. तसेच वारंवार डोळे दुखतात आणि डोळ्यांमधून पाणी येते.

Visual impairment | pinterest

तोल जाणे

अचानक चक्कर येणे, भोवळ येणे, किंवा चालता न येणे आणि शरीराच्या हालचालींमध्ये समन्वय साधता न येणे. हे चालता -बोलता होऊ शकते.

balance | pinterest

मळमळ - उलटी

पोटाशी संबंधित कोणतेही स्पष्ट कारण नसताना अचानक आणि तीव्र उलटी होणे. तसेच छातीत वेदना होणे ही लक्षणे तुमचे डोक्याचे आरोग्य धोक्यात असल्याचे सांगतात.

Vomiting | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : निरोगी हृदय, तल्लख मेंदू! आजपासूनच करा 'हे' सोपे उपाय, हार्ट अटॅकचा धोका टळेल

Heart-Brain Health | AI PHOTO
येथे क्लिक करा...