Brain Cancer: सकाळी वारंवार डोकं दुखतंय? डोकेदुखी ठरू शकते धोक्याची घंटी

Bharat Jadhav

कॅन्सरची लक्षणे

ब्रेन कॅन्सर म्हणजेच मेंदुचा कर्करोग हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. याची लक्षणे पाहता, डोकेदुखी, थकवा आणि एकाग्रता साधण्यात अडचण येणे यांसारख्या समस्या जाणवतात.

लोकांचा गैरसमज

गुरुग्राममधील आर्टेमिस हॉस्पिटल्समधील न्यूरोसर्जरी आणि सीएनएस (CNS) रेडिओसर्जरी विभागाचे अध्यक्ष तसेच सायबरनाइफ सेंटरचे सह-प्रमुख डॉ. आदित्य गुप्ता यांच्या मते, बहुतेक लोक गैरसमजुतीमधून तणाव किंवा कामाचा दबावामुळे डोकेदुखी होत असल्याचं म्हटलं जातं. कारण तणावामुळे डोकेदुखी आणि थकवा यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात.

कॅन्सर असू शकतो

काही वेळा हे लक्षण मेंदूच्या कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे सुरुवातीचे लक्षण असू शकतात. त्यामुळे, जर या समस्या कायम राहिल्या किंवा अधिकच बळावल्या, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

ब्रेन कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती?

डॉ. आदित्य गुप्ता यांच्या मते, सकाळी होणारी सततची डोकेदुखी, वारंवार होणाऱ्या उलट्या, अंधुक दिसणे, शरीराच्या एखाद्या भागात अशक्तपणा किंवा बधीरपणा जाणवणे. शरीराचा तोल जाणे आणि चालताना अडचण येणे, ही लक्षणं सुरुवातीला असतात.

सुरुवातीला होतं दुर्लक्ष

ही सर्व लक्षणे तणाव, मायग्रेन आणि कधीकधी झोपेच्या कमतरतेशी संबंधित लक्षणांसारखीच असतात. त्यामुळेच लोक याकडे फारसे गांभीर्याने पाहत नाहीत आणि डॉक्टरांकडे जाण्यास विलंब करतात.

न्यूरोलॉजिस्टकडे कधी जावे?

जर वारंवार असा त्रास होत असेल, म्हणजे डोकेदुखी पुन्हा पुन्हा होत असेल. सर्वसामान्य औषधांनी आराम मिळत नसेल, कालांतराने ती वाढत असेल आणि त्यासोबत उलट्या होणे किंवा अंधुक दिसणे यांसारखी लक्षणे दिसत असतील,तर तुम्ही ताबडतोब न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा.

ही गोष्ट लक्षात ठेवा

डॉक्टर हे लक्षात ठेवण्याचाही सल्ला देतात की, डोकेदुखी किंवा थकवा जाणवण्याची प्रत्येक घटना ही मेंदूच्या कर्करोगाचे लक्षण नसते. जरी या सामान्य असल्या तरी सतत जाणवणारी किंवा असामान्य लक्षणे दुर्लक्षित करणे शहाणपणाचे ठरणार नाही.

हेही वाचा

येथे क्लिक करा

डोक्याला सतत खाज का सुटते? टाळूची खाज कशी घालवायची?