Shreya Maskar
शरीर हायड्रेट आणि निरोगी ठेवण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे. पाणी रक्त शुद्ध करण्यास (विषारी पदार्थ काढून टाकण्यास) मदत करते आणि शरीरातील अतिरिक्त सोडियम देखील काढून टाकते, ज्यामुळे उच्च रक्तदाबावर नियंत्रणात राहतो.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी दररोज ६ ते ८ ग्लास (२ ते २.५ लिटर) पाणी पिणे गरजेचे आहे.
हाय बीपीच्या लोकांनी कायम साधे (Room Temperature) किंवा कोमट पाणी प्यावे. चुकूनही थंड आणि जास्त गरम पाणी पिऊ नका.
उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी मिठाचे सेवन अत्यंत मर्यादित करणे आवश्यक आहे. जेणेकरून बीपी कायम कंट्रोलमध्ये राहतो.
पाणी शरीरातील रक्ताचे प्रमाण आणि जाडी (viscosity) नियंत्रित करते. पुरेसे पाणी पिल्याने हृदयाची कार्यक्षमता सुधारते.ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत राहतो.
शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यास डिहायड्रेशनमुळे रक्त घट्ट होऊन हृदयावर ताण पडतो, ज्यामुळे ठोके अनियमित होणे, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी नारळ पाणी प्या. टरबूज , काकडी, डाळिंब आणि बेरी ही फळे खावी, कारण यात पाण्याचे प्रमाण सर्वात जास्त असते.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.