Sakshi Sunil Jadhav
दिवसभर पुरेसे पाणी प्या. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास रक्तदाब कमी होऊ शकतो.
कमी मीठ असलेले ताक आणि लिंबूपाणी शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करतात.
नारळपाण्यात पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकते.
एकाच वेळी खूप जेवण्याऐवजी योग्य प्रमाणात जेवा. यामुळे जेवणानंतर रक्तदाब कमी होण्याचा धोका काही लोकांमध्ये कमी होऊ शकतो.
जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे पापड, लोणची आणि खारट पदार्थ कमी खा.
फळे, भाज्या आणि डाळींचा आहारात समावेश करा. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.
दररोज चालणे आणि नियमित व्यायाम करणे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.
रक्तदाब वारंवार कमी किंवा जास्त होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. छातीत दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या.