Shreya Maskar
जेव्हा शरीरातील द्रवपदार्थ मोठ्या प्रमाणात कमी होतात, हृदयाच्या कार्यक्षमतेत बिघाड होतो किंवा रक्तवाहिन्या प्रमाणाबाहेर प्रसरण पावतात, तेव्हा रक्तदाब कमी होतो. रक्तदाब कमी झाल्यावर तुम्ही त्वरित हे उपाय करू शकता.
रक्तदाब कमी होतो, तेव्हा चक्कर येणे आणि पडून होणाऱ्या दुखापती टाळण्यासाठी त्वरित खाली बसा किंवा झोपा. मेंदूकडे होणारा रक्तप्रवाह वाढवण्यासाठी तुमचे पाय हृदयाच्या पातळीपेक्षा उंचावर ठेवा.
रक्ताचे प्रमाण आणि रक्तदाब वेगाने वाढवण्यासाठी १-२ ग्लास पाणी प्या, खारट पदार्थ खा किंवा कॉफी प्या.
कॉम्प्रेशन स्टॉकिंग्जमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि पायांमध्ये रक्त साचून राहण्याचे प्रमाण कमी होते. बसताना पाय एकमेकांवर टाकल्यास रक्तदाब वाढण्यास मदत होऊ शकते.
दर काही मिनिटांनी थोडे थोडे जेवण करा. जेवणामध्ये जास्त अंतर ठेवू नका. कमी प्रमाणात थोड्या थोड्या वेळाने खाल्ल्याने तुमचा रक्तदाब अचानक कमी होण्यापासून वाचेल.
रोज किमान दोन ते तीन लिटर पाणी प्या. जर तुमचा रक्तदाब कमी असेल, तर नारळाचे पाणी, बेलफळाचा रस आणि उन्हाळ्यात आंब्याचा ज्यूस प्या.
उच्च रक्तदाबासाठी मीठ कमी खाणे आवश्यक असले तरी, कमी रक्तदाबाचा धोका असलेल्या व्यक्तींना त्यांच्या सोडियमचे सेवन थोडे वाढवण्याची गरज भासू शकते. सॅलडमध्ये थोडे मीठ टाका. तसेच मीठ घातलेले लिंबाचे पाणी प्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT : कामाच्या ठिकाणी अचानक BP वाढला? त्वरित करा 'हे' उपाय, मिळेल पटकन आराम